उंड्री भागातील विजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यकारी अभियंता धवल सावंत यांना निवेदन देताना माजी उपसभापती सचिन घुले व प्रविण आबनावे(छाया संदिप डोके हडपसर)
____________________________________
हडपसर दि.१३(प्रतिनिधी संदिप डोके)
पुणे महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षापुर्वी समाविष्ट झालेल्या११ गावांचा प्रभाग क्रमांक ४२मधील उंड्री भागात गेल्या अनेक दिवसांपासुन वारंवार विजपुवठा खंडीत होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत महापालिकेत समाविष्ट होऊन देखील रात्रीच्या वेळी तासन तास विजपुरवठा खंडीत होत असल्याने विद्यार्थी,जेष्ठ नागरीक महिला वर्ग हैराण झाला आहे तरी महापालिकेने याकडे लक्ष देऊन विजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुलेे व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण आबनावे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता धवल सावंत यांना सचिन घुले व प्रविण आबनावे यांनी लेखी निवेदनाद्वारे उंड्री परीसरातील विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे उंड्री भागात झपाट्याने नागरीकरन झाल्याने लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे विज वाहिन्यांवर लोड येत असुन जादा ट्रान्सफार्मर बसविने गरजेचे आहे जुन्या झालेल्या वीज वाहिन्या बदलुन नविन भुमित विजवाहिनी टाकावी नागरीकरण वाढल्याने या भागासाठी महावितरणचे कर्मचारी देखील अपुरे पडत आहे ती वाढवावी , कंत्राटी कामगारांना ओळखपत्र देऊन जबादारीने काम करण्यास सांगावे उंड्रीगावठाण,उंड्री चौक ,होलेवस्ती,आंबेडकर चौक,कडनगर चौक तसेच सर्वे नंबर ४७ ते ५० पर्यत जुने विजेचे खांब असुन त्यावर तारा लोंबकळत आहे त्यामुळे भविष्यात अपघात होण्याचा संभव आहे अनेकदा छोटे मोठे अपघात देखील झाले आहे तारा वारंवार तुटुन या भागात नेहमी विज पुरवठा खंडीत होतो त्यामुळे या भागातील नागरीक हैरान झाले आहे वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे मुश्किल झाले आहे तरी महावितरणने अघोषित भारनियमन बंद करुन लवकरात लवकर या भागातील विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपसभापती सचिन घुले व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण आबनावे यांनी दिला आहे.