मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सणसवाडी येथे ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’ प्रकल्पाचे उद्घाटन   

सणसवाडी, दि. ८ जून: पुणे जिल्ह्यातील शिरूर औद्योगिक वसाहतीमध्ये जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स या आघाडीच्या कृषी यंत्रसामग्री कंपनीच्या सणसवाडी येथील नव्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे औपचारिक स्वागत केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक संदीप गिल, जॉन डिअरचे वरिष्ठ अधिकारी राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जॉन डिअर कंपनीने ‘मेक इन महाराष्ट्र’ संकल्पनेला चालना देत कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित स्मार्ट मशिन्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अधिक सक्षम होतील आणि भारतात उत्पादित ही यंत्रसामग्री जागतिक बाजारपेठेत पोहोचेल.”

फडणवीस यांनी नमूद केले की, हवामान बदलाच्या काळात शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे. जॉन डिअरसारख्या संस्थांकडून स्मार्ट मशिन्स, ऑटोमेशन, आणि ए आय आधारित प्रणाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. “कृषी हॅकॅथॉनमध्ये उभ्या राहिलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरण्यासाठी जॉन डिअर सारखी कंपनी सक्षम आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जॉन डिअरच्या धोरणाचा विशेष उल्लेख करत सांगितले की, “या प्रकल्पामध्ये ७० टक्के महिलांना रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही संस्था ‘मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या तिन्ही गोष्टींचा आदर्श उदाहरण आहे. संस्थेचा ८० टक्के महसूल हा निर्यातीमधून मिळत असून, डिझायनिंग आणि प्रमाणिकरणाची कामे देखील भारतातच होत असल्याने ही एक खरी भारतीय संस्था ठरते.”

प्रास्ताविकात जॉन डिअरचे राजेश सिन्हा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील औद्योगिक अनुकूल वातावरणामुळे कंपनीने इथे पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. नव्या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढेल आणि उत्पादनात गुणात्मक वाढ होईल. “पुण्यातील उत्पादन संपूर्णतः भारतातच तयार केले जात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी युनिटचा प्रत्यक्ष दौरा करून उत्पादन प्रक्रिया, डिझाईन यंत्रणा आणि कृषी यंत्रसामग्रीची माहिती घेतली. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

शिरूर औद्योगिक पट्टा नव्या औद्योगिक पर्वाकडे वाटचाल करत असून, ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’ प्रकल्पामुळे सणसवाडी आणि परिसरात रोजगार व आर्थिक विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें