वाघोली, गाडे वस्ती येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात  

वाघोली (ता. हवेली) – पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडे वस्ती येथे (दि. ७ जून) पहाटे पाचच्या सुमारास आयशर दहा चाकी कंटेनर व XUV कार (MH-14-LP-8350) या चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, XUV वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला घेतल्यावर, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्याचा मारा करून रस्ता पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली.

अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (वाघोली वाहतूक विभाग, पुणे) यांनी दिली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें