शिरूर; बनावट बिलाद्वारे शासकीय निधीचा अपहार – दोन माजी सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल  

शिरूर, दि. ७ जून २०२५: चर्मकार वस्ती रस्त्याच्या कामासाठी बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील कुरुळी गावातील दोन माजी महिला सरपंचांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विष्णू लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. बिजे कॉर्नर, शिरूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जून २०१८ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत कुरुळी गावातील ग्रामपंचायत हद्दीत चर्मकार वस्ती रस्त्याच्या कामासाठी “न्यू साईराज ट्रेडर्स” या फर्मकडून खोटे चलन (क्रमांक ३७५०) तयार करून, त्या आधारे प्रतीभा प्रमोद बोरकर व शहनाज अरीफ पठाण या तत्कालीन सरपंचांनी १,३१,२०० रुपयांची रक्कम अदा केली.

पुढे तपासात असे समोर आले की, सदर जीएसटी बिलांचे कर भरण्यात आले नव्हते. तसेच, मजुरांच्या हजेरी पत्रकात खाडाखोड करून कामासाठी ६ मजूर असतानाही केवळ सुरज दशरथ भोईटे याच्या नावाने २४,००० रुपये धनादेशाद्वारे अदा करण्यात आले. यामुळे सुमारे १,५५,२०० रुपयांचा शासकीय निधी अपहार झाल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा क्रमांक ३९०/२०२५ नोंदवला आहे. प्राथमिक तपास सफौ थेऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास पोसई नकाते करत आहेत.

शासन निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आणखी दोषी व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता असून, ग्रामविकास खात्याकडूनही याप्रकरणी स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें