अनधिकृत इमारतीवर PMRDAची कारवाई : मारुंजीत ६ मजली इमारत जमीनदोस्त

 

प्रतिनिधी, मारुंजी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी मौजे मारुंजी येथील सर्वे क्रमांक ४५/१/२ मधील परवानगीविना उभारलेली सहा मजली इमारत जमीनदोस्त केली.

या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाचा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे — परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम खपवून घेतले जाणार नाही.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रभारी महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील तसेच प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

PMRDAने मागील काही दिवसांत अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमण तसेच अनधिकृत इमारतींविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून मारुंजीतील ही कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा प्रकारच्या इतर बांधकामांवरही कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, PMRDAकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी कोणतेही बांधकाम परवानगीशिवाय करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. अनधिकृत बांधकामांमुळे नियोजनबद्ध विकासास अडथळा निर्माण होतो, तसेच पर्यावरणावरही गंभीर परिणाम होतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें