जुन्नर, आंबेगावमध्ये भाजपा संघटनात्मक बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा

जुन्नर (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या जुन्नर व आंबेगाव विधानसभा दौऱ्यानिमित्त येथे एक भव्य संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत जुन्नर विधानसभा क्षेत्रातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.दौऱ्या दरम्यान जागतिक पर्यावरण दिनानिमित् जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले

या बैठकीत मंडल कार्यकारिणी गठीत करणे, बूथ समितींचे नियोजन, भाजपा सक्रिय सदस्य नोंदणी, SEO फॉर्म भरणे, तसेच ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष मोहिमेचे नियोजन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी यावेळी केले.

बैठकीदरम्यान जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, पुणे जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे, युवा मोर्चा कार्यकारिणी अध्यक्ष गणेश कवडे, मा.अध्यक्ष जुन्नर तालुका संतोष खैरे, मा.उपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे, तसेच विविध मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मंचर (ता. आंबेगाव) येथेही आजी-माजी पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आंबेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीच्या माध्यमातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यात भाजपा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी संघटनात्मक दृष्टिकोनातून दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आला आहे.

#जुन्नरतालुका #आंबेगाव_तालुका #मंचर  भाजपदौरा #संघटनात्मकबैठक #पुणेभाजपा #महाराष्ट्रभाजपा #boothsamiti #sankalpSeSiddhi #BJP2025

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें