२५ वर्षांनंतर गाठली शाळेची पायरी; माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात संपन्न  

 विनायक साबळे

कोरेगाव भिमा (ता. शिरुर) दि. १ जून २०२५ – “शाळा तीच, चेहेरे नवे, आठवणी जुन्याच” – या भावना घेऊन श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल, कोरेगाव भिमा येथील सन २०००-०१ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत, शाळेच्या प्रांगणात आठवणींचा जणू जल्लोषच साजरा केला. पंचवीस वर्षांनंतर परत एकत्र जमल्याचा आनंद आणि बालमित्रांच्या भेटीने भारलेले वातावरण अनुभवण्यासारखे होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. शाळेच्या माजी शिक्षकांपैकी हरीश्चंद्र आवारे, एन. के. पोळके, सौ. वर्षा वाजे, सौ. वृषाली काळभोर तसेच मुख्याध्यापक अडुरकर सर उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देतानाच, जीवनाच्या विविध टप्प्यांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव शेअर करत एकमेकांच्या वाटचालीला दाद दिली. विशेष म्हणजे, अनेकांनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत व शैक्षणिक उपक्रमांत सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, नृत्य, आणि भाषणांनी सजलेले सांस्कृतिक सादरीकरण झाले. या कलाकारांमध्ये नव्याने उभारी घेतलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने वातावरणात रंगत वाढली. भावनांनी भारलेल्या क्षणांनी सभागृह भारून गेले.

कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजन व सर्वांच्या समूहछायाचित्र सत्राने झाली. उपस्थितांनी दरवर्षी असेच संमेलन घेण्याचा संकल्प केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच संदीप ढेरंगे, भाऊसाहेब गव्हाणे, राजश्री वाघमारे, मंजुषा भोकरे, स्वप्नील गव्हाणे, महेंद्र खांदवे यांचा विशेष सहभाग होता. सूत्रसंचालन सुवर्णा ढेरंगे व पवन कट्यारमल यांनी केले, तर आभारप्रदर्शन विवेक ढेरंगे यांनी व्यक्त केले. शिक्षकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घडवलेला हा प्रेरणादायी सोहळा पुढील पिढ्यांसाठी नक्कीच आदर्श ठरेल.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें