प्राध्यापकाकडून पेपर लिहून घेण्याचा गैरप्रकार उघड – आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक

वाघोली; दि. ३ जून २०२५ – आर्थिक फायद्यासाठी इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत युनिट ६ गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली येथे घडलेल्या या प्रकारात प्राध्यापकासह एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली असून २ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम व उत्तरपत्रिकांचे बंडल जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, युनिट ६ चे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना २ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की वाघोली येथील वरील कॉलेजमधील मेकॅनिकल कॅडकॅम विभागाचे प्राध्यापक प्रतिक सातव हे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पहिल्या वर्षाच्या ‘इंजिनिअरिंग मॅथेमॅटीक्स २’ या विषयाच्या उत्तरपत्रिका परत लिहून घेत आहेत.

सदर माहितीच्या अनुषंगाने ३ जून रोजी युनिट ६ च्या पथकाने छापा टाकून प्राध्यापक प्रतिक किसन सातव (३७), तसेच विद्यार्थी आदित्य यशवंत खिलारे (२०), अमोल आशोक नागरगोजे (१९), अनिकेत शिवाजी रोडे (२०) या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ६ उत्तरपत्रिकांचे बंडल, २,०६,००० रुपयांची रोख रक्कम व कंट्रोल रूमची बनावट चावी जप्त केली.

तपासादरम्यान उघड झाले की, सदर आरोपींनी परीक्षेत नापास होण्याची भीती असलेल्या विद्यार्थ्यांकडून १० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन परिक्षा कंट्रोल रूममधील उत्तरपत्रिका चोरून विद्यार्थ्यांना परत लिहायला दिल्या. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक झाली असून, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.

याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३१८(२)(३)(४), ६१(२) आणि सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक २०२४ अंतर्गत कलम ४, ५, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेतील अपप्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली असून, अशा घटकांवर कठोर कारवाईची मागणी समाजातून होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें