अवैध वाहतुकीवर तहसिलदारांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; सातच वाहनांकडे पास   

कारवाईत सातत्य ठेवणार – तहसिलदारांची माहिती 

लोणीकंद येथील सुरभी चौकात अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या तीन बारा सदस्यीय पथकाने अवैध वाहतूक दारांवर धडाकेबाज कारवाई केली आहे. सोळा वाहनांची तपासणी केली असता फक्त सात वाहनचालकांकडे वाहतूक पास आढळले. उर्वरित वाहनचालकांनी नियम मोडले होते.

या कारवाईदरम्यान एका ड्रायव्हरांनी अधिकाऱ्यांच्या समोरून गाडी आतून पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र, पथकाने तत्काळ त्याचे फोटो व्हिडिओ काढत ती गाडी ताब्यात घेतली. तहसीलदार तृप्ती कोलते यांनी स्वतः भाग घेतून स्पष्ट केले की, “नियमभंग करणाऱ्यांना आता माफ नाही.”

तहसीलदारांच्या आगमनाची माहिती मिळताच अनेक डंपर चालक आणि मालकांची पळापळ झाली, डंपर गायब झाले. परिसरात अचानक भयानक शांतता पसरली आहे.

अवैध वाहतुकीच्या उपरोधकांवर आता कठोर कारवाईची वेळ आली आहे, असा संदेश प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत सातत्य राखून पुढील काळातही नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध शिस्तबद्ध कारवाई होणार आहे.

“कोणालाही नियम मोडण्याची मुभा नाही, नियम मोडणाऱ्यांना शासनाच्या कायद्याचा धाक चालेल असा इशाराच आजच्या कारवाईतून तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिला आहे.

खाण व्यवसायिका समवेत तहसीलदार यांची आज नियोजित बैठक होती, त्यामुळे काही दगड खाण व्यवसायिकांना तहसीलदार येण्याची माहिती होती त्यामुळे अनेक खाण व्यवसायिकांनी आपली डंपर वाहने बंद ठेवले होती त्यामुळे अशा पूर्व नियोजित कार्यक्रमाच्या वेळी कारवाई न करता अचानक पणे धाडसत्र राबवणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें