लोणीकंद (ता. हवेली) : जुन्या पिढीतील सच्चे बंधुप्रेम जपणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे, कधीही कोणत्याही गोष्टींचा गर्व न करणारे, लोणीकंद गावातील वाळू व्यावसायिक कै. उत्तम आनंदराव कंद यांचे आज १९ वे पुण्यस्मरण आहे.
लोणीकंद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व. आदिनाथ आनंदराव कंद यांचे बंधू होत. दोन्ही बंधूंच्या निधनानंतर कंद कुटुंबाची सर्व जबाबदारी आदिनाथ यांचे सुपुत्र दिगंबर कंद यांनी खांद्यावर आली. सामाजिक कार्य, कुटुंबातील एकोप्याची भावना आणि पारंपरिक व्यवसाय यांचा समन्वय साधत त्यांनी कुटुंबाला सांभाळले.
कै. उत्तम कंद यांच्या पश्चात दोन कर्तृत्ववान मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या साध्या, शांत आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाची आठवण आजही गावकरी आणि परिवाराच्या मनात ताजी आहे. आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कंद परिवारातर्फे स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.