लोणीकंद प्रतिनिधी
लोणीकंद ता.हवेली येथील शेवटच्या सोमवार निमित्त भाविकांनी मृत्युंजयश्वेर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटे पासुनच गर्दी केली होती.पहाटे मृत्युंजयश्वेर महादेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.व जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले.
मंदिर परीसर ग्रामस्थांच्या वतिने मंदिराला फुलांची तसेच विद्युत रोशनाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचा परीसर खुलुन दिसत होता.
आलेल्या भाविकांना शिंदे रविराव परिवार व पाहुणे मंडळी, व लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने खिचडी,खजुर,केळी ,गुडदानीचा फराळ व संध्याकाळी भोजनाचा लाभ भाविकांनी घेतला.