गंगा वाटीका सोसायटीतील पंप चोरी प्रकरण: लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल  

लोणीकंद, तालुका हवेली येथील गंगा वाटीका सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून एकूण आठ पाण्याचे पंप आणि एक मडपंप चोरीस गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीनुसार, सोसायटीचे चेअरमन सोमनाथ श्रीधर शिंदे यांनी २३ मे २०२५ रोजी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या माहितीनुसार, गंगा वाटीका सोसायटीच्या ई विंगजवळील जमीनीलगत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (STP) वापरण्यात येणारे पंप दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी ४ मार्च पासून प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. यासाठी काम देण्यात आलेल्या व्हीआयपी एटीपी सर्व्हिसेसचे प्रतिनिधी राठोड यांनी मडपंप तेथे आणून ठेवला होता.

१८ मे रोजी, दुपारी सुमारे दीड वाजता राठोड यांनी प्रकल्पस्थळी जाऊन पंप गायब असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सोसायटीचे सचिव रजनीकांत मुनी, खजिनदार सचिन वाघचौरे आणि व्यवस्थापक प्रदीप सौदागर यांच्यासह घटनास्थळी पाहणी केल्यानंतर चोरीची खात्री पटली.

चोरीस गेलेल्या पंपांमध्ये १.५ एचपीचे चार, ५ एचपीचे दोन, ७.५ एचपीचे दोन किर्लोस्कर कंपनीचे पंप तसेच एक बटालीका कंपनीचा मडपंप यांचा समावेश आहे.

लोणीकंद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स सर्जेराव कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये चोरीच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, सोसायटीतील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात लवकरच दोषींना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें