कोंढवा खुर्द  येथील विद्यार्थी वाहतुक संघटनेच्या वतिने “सत्यनारायण पुजेचे” आयोजन 

 

श्री स्वामी समर्थ विद्यार्थी वाहतुक संघटनेच्या पुजेप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर व माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांचा सत्कार करताना संघटनेचे पदाधिकारी(छाया:संदिप डोके हडपसर)

 

हडपसर दि.११(प्रतिनिधी संदिप डोके)

कोंढवा खुर्द लुल्लानगर येथील माऊंट कार्मल स्कुलच्या विद्यार्थी वहातुक संघटनेच्यावतिने श्रावणमासानिमित्त सत्यनारायण महापुजा आयोजीत केली होती व श्री स्वामी समर्थ विद्यार्थी वाहतुक संघटनेने पुजेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक तानाजी लोणकर,माजी नगरसेविका आरती बाबर तसेच अनेक राजकिय ,सामाजीक मान्यवरांनी भेट दिली.

 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले,उपाध्यक्ष अविनाश तनपुरे,कार्यध्यक्ष नर्सिंग राजपुत,संजय पडवळ,युवा नेते गणेश बाबर,राजु ससाणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले श्रावण मासानिमित्त संघटनेच्या गाड्यांची हार ,रांगोळी काढुन सजावट केली होती उपस्थितांचेआभार गणेश बाबर यांनी मानले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें