“ऑपरेशन सिंदूर”च्या प्रेरणेने लोणीकंदमध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

जनप्रवास प्रतिनिधी | १८ मे २०२५

लोणीकंद: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद येथे रविवारी राष्ट्रभक्तीच्या उर्मीने भारलेली भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली.

 

सकाळी दहा वाजता सोमेश्वर पतसंस्था येथून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप ग्रामपंचायत चौकात राष्ट्रगीताने झाला. रॅलीचे नेतृत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष (उत्तर) प्रदीप विद्याधर कंद यांनी केले.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, माजी जि.प. सदस्य शंकर भूमकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, माजी सभापती नारायण कंद, संदीप भोंडवे, रवींद्र कंद, कल्पेश जाचक, प्रदीप सातव, गणेश चौधरी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला करून जागतिक पातळीवर सामर्थ्य सिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रॅलीत हातात तिरंगा घेतलेल्या नागरिकांच्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

‘आरंभ है प्रचंड’च्या जोशात निघालेली ही रॅली केवळ मिरवणूक नसून, भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना देणारा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव ठरला. युवकांमध्ये देशप्रेम जागवण्याचा आणि सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला. ग्रामस्थांच्या एकजूटीतून भरवलेली ही तिरंगा रॅली प्रेरणादायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें