जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रदीप कंद यांची देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा भेट; आभार व्यक्त”

पुणे – भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक ताकद, सातत्यपूर्ण पक्षनिष्ठा आणि जमीनीवरचं कार्य ओळखत प्रदीप कंद यांची पुणे जिल्हाध्यक्ष (उत्तर) पदासाठी निवड केली आहे. ही निवड केवळ एका कार्यकर्त्याचा सन्मान नसून, पक्षाच्या भविष्यासाठी तयार होणाऱ्या नव्या नेतृत्वावरचा विश्वासही आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीनंतर प्रदीप कंद यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मा.ना.  देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आणि पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.

भेटीदरम्यान पक्षवाढीच्या आगामी दिशा, पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, तसेच कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक चर्चा झाली. नव्या जबाबदारीच्या निमित्ताने प्रदीप कंद यांनी पक्षासाठी अधिक जोमाने आणि निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या भेटीला दौंडचे आमदार राहुल  कुल, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, पुणे भाजपचे सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, शिरूर तालुका अध्यक्ष मा. आबासाहेब सोनवणे आणि रोहीत खैरे यांची उपस्थिती होती, ज्यामुळे हा क्षण अधिक गौरवशाली ठरला.

“पक्षसंघटनेसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष उभा आहे,” हा स्पष्ट संदेश या नियुक्तीद्वारे देण्यात आला आहे.

#भारतीयजनतापार्टी #प्रदीपकंद #पुणेभाजप #जिल्हाध्यक्षउत्तर #देवेंद्रफडणवीस #राजकीयदृष्टीकोन #BJPMaharashtra #StrongLeadership #SadicchaBhet

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें