पुणे – चऱ्होली (ता. हवेली) येथील युवक आणि सर्जनशील दिग्दर्शक संतोष भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट कलाकृती आणि सामाजिक भान असलेल्या सिनेमांमुळे ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने पुरस्कार 2025’ तसेच ‘छावा हिंदू राष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या विशेष गौरवप्रसंगी डॉ. अविनाश सकुंडे आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई यांच्या हस्ते संतोष भोसले यांचा सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तिपर विषयांवर काम करणाऱ्या भोसले यांच्या कार्याची दखल या माध्यमातून घेण्यात आली आहे.
सत्कारानंतर प्रतिक्रिया देताना संतोष भोसले म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या कार्यात सहकार्य करणाऱ्या संपूर्ण टीमचा आहे. माझ्या कार्याला मान्यता दिल्याबद्दल मी आयोजकांचे व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
संतोष भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी समाजमनावर सकारात्मक परिणाम केला असून, त्यांच्या पुढील प्रकल्पांकडे आता कलाक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
#SantoshBhosale #DadasahebPhalkeAward #ChhavaHinduRashtraBhushan #TruptiDesai #DrAvinashSakunde #PuneTalent #PMRDARegion #FilmDirectorHonour #MarathiCinema