आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाचं पाऊल! पीएमआरडीएकडून ‘PDRF’ ची स्थापना – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर पथक

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘Pune Metropolitan Disaster Response Force’ (PDRF) या स्वतंत्र आणि समर्पित आपत्ती प्रतिसाद पथकाची स्थापना केली आहे. या पथकाच्या माध्यमातून प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी त्वरित व प्रभावी मदत मिळणार आहे.

पूर, आग, रस्ते अपघात, इमारती कोसळणे, ढिगाऱ्याखाली अडकलेले नागरिक यांसारख्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींमध्ये PDRF पथक तत्काळ प्रतिसाद देईल. प्रशिक्षित जवान, आधुनिक यंत्रसामग्री आणि सज्ज तंत्रज्ञ यांच्या मदतीने हे पथक PMRDA क्षेत्रासाठी 24×7 सज्ज आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

PDRF – प्राधिकरण क्षेत्रासाठी स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद पथक
24×7 हेल्पलाइन: 9545282930
प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक साधने आणि जलद प्रतिसाद यंत्रणा

हा उपक्रम केवळ आपत्ती नियंत्रणापुरता मर्यादित नसून, PMRDA क्षेत्रातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारा आहे. “कोणतीही अडचण असो, PDRF तुमच्यासोबत आहे!” असा दिलासादायक संदेशही प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे.

PMRDAच्या या पावलामुळे नागरी सुरक्षेला नवी दिशा मिळाली असून, शाश्वत आणि सुरक्षित शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल अधिक मजबूत झाली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें