कायद्याच्या चौकटीतच करा बांधकाम; अन्यथा थेट कारवाई – पीएमआरडीएचा इशारा

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत येणाऱ्या भागात विनापरवानगी उभारण्यात येणाऱ्या शेड, घरे, ऑफिस इत्यादींवर आता थेट कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा पीएमआरडीएकडून देण्यात आला आहे. कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी प्राधिकरणाची परवानगी घेणे अनिवार्य असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच तोडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.

सध्या पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरी विकासासोबतच सार्वजनिक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. याला आळा बसावा आणि नियोजनबद्ध शहरविकास साधावा, यासाठी प्राधिकरणाने आता अधिक कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

“बांधकाम करा… पण कायद्याच्या चौकटीत!” असा स्पष्ट संदेश देत पीएमआरडीएने नागरिकांना सूचना केली आहे की, कोणत्याही प्रकारचे शेड, घर किंवा व्यवसायिक आस्थापना उभारण्यापूर्वी नियमानुसार आवश्यक परवानग्या घ्याव्यात. विनापरवानगी उभारण्यात आलेल्या संरचना पाडण्यात येणार असून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बांधकाम परवानगी प्रक्रियेची माहिती घ्यावी आणि कोणत्याही गैरवर्तनापासून स्वतःचे नुकसान टाळावे, असे आवाहनही पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें