लोणीकंद (ता. हवेली) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या इ. १० वी फेब्रुवारी २०२५ च्या निकालात डॉ. बसु विद्या धाम हायस्कूलची विद्यार्थिनी पूनम राजू कांबळे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तीने शाळेत प्रथम क्रमांक मिळवत उज्वल यशाची नोंद केली आहे.
पुणे विभागाच्या या परीक्षेत पूनम हिने एकूण ५०० पैकी ४५३ गुण मिळवले असून तिला ९०.६० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे तिला क्रीडा/कला गुणांपोटी अतिरिक्त ३ गुण मिळाले आहेत. तिच्या विषयवार गुणांचे तपशील असे — मराठी: ९३, हिंदी: ९२, इंग्रजी: ८६, गणित: ८६, विज्ञान व तंत्रज्ञान: ८९, आणि सामाजिक शास्त्र: ९०.
या घवघवीत यशामुळे तिचे कुटुंबीय, शिक्षकवर्ग आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पूनमचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.