वाघोली व केसनंद परिसरातील अवैध धंद्यांविरोधात कुशाल सातव यांचा पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज

पुणे, दि. २ मे — वाघोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील केसनंद व वाघोली परिसरात विविध अवैध धंदे सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर एक जागरूक नागरिक पुढे येत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. कुशाल गोरख सातव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या लेखी निवेदनात यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “केसनंद व वाघोली भागात अवैध भंगार व्यवसाय, जुगार, मटका, स्पा, क्लब, दारू विक्री, गुटखा विक्रीसारखे गैरकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे सर्व धंदे समाजात विघातक परिणाम घडवत असून, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करत आहेत.”

सातव यांनी या प्रकारांविरोधात पोलिसांनी तत्काळ योग्य ती शहानिशा करून कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, “जर पोलिस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झाली नाही, तर मला कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने स्वतंत्र लढा उभारावा लागेल.”

हा अर्ज वाघोली पोलीस ठाण्यात दिनांक २ मे रोजी जमा करण्यात आला. या तक्रारीची दखल पोलीस प्रशासन घेतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांत या अवैध धंद्यांविरोधात अस्वस्थता असून, योग्य कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें