कु. वैष्णवी भोसले ला घवघविता यश; सेंट जोसेफ स्कूलमध्ये मिळवला प्रथम क्रमांक

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील कु. वैष्णवी वसंत भोसले हिने सेंट जोसेफ स्कूल, रामलिंग रोड, शिरूर येथील इयत्ता नववीच्या परीक्षेत ९२% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आलेगाव पागा ग्रामस्थांनी व मान्यवरांनी तिचा सत्कार करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक पटकावत वैष्णवी हिने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल आलेगाव पागा येथील माजी सरपंच मा. आप्पासाहेब बेनके, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोसले, सचिव संभाजी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासो रासकर, माजी सरपंच बापुसाहेब काळे (निमगाव म्हाळुंगी) तसेच जयेशदादा शिंदे (अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, शिरूर तालुका) आदी मान्यवरांनी तिचे विशेष कौतुक केले.

कु. वैष्णवी सध्या इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून, “दहावीत ९५% पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा माझा निश्चय आहे,” असे मत तिने व्यक्त केले. आपल्या यशाचे श्रेय तिने वडील वसंत भोसले, आई मणिषा भोसले तसेच शिक्षक वर्गाला दिले आहे. ही माहिती शरदराव रासकर (सरचिटणीस, भाजपा किसान मोर्चा, पुणे जिल्हा; प्रदेश सल्लागार, सावित्री महिला प्रतिष्ठान; उपाध्यक्ष, माळी महासंघ, पुणे जिल्हा) यांनी दिली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें