लोणीकंद प्रतिनिधी
खेड तालुक्यातील चाकण (भाम )येथे दिनांक ९/९/२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते झाले व भाजपा ची नवीन कार्यकारणी पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी जाहीर केली.आजपर्यंत मी केलेल्या कार्याची पावती म्हणून भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हा “सरचिटणीसपदी “नियुक्ती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र लोकसभा संयोजक संजय उर्फ बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, व शिरूर हवेलीचे निवडणूक प्रमुख प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
सरचिटणीस पदी निवडीनंतर प्रथम शिरूर येथे जाऊन ‘स्वर्गीय’ लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचारणे यांच्या समाधी स्थळी पुष्पहार घालून दर्शन घेतले तसेच तळेगाव ढमढेरे येथे जाऊन ‘स्वर्गीय’ संभाजी अण्णा भुजबळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दर्शन घेतले या प्रसंगी शिरूर शहराचे नगरसेवक नितीन पाचारणे, शिरूर पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे नवनाथ भुजबळ, कैलास सोनवणे, विशाल खरपुडे ,संदीप पह्राड दीपक गायकवाड आदींसह शिरूर शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येणाऱ्या पुढील काळात अधिक जोमाने काम करून पक्षाची ध्येय तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार असल्याचे भगवान शेळके यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.