नवी दिल्ली | ७ मे २०२५ (पीआयबी वृत्तसेवा) –
भारतीय सैन्यदलाने थोड्याच वेळापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईत एकूण ९ ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून टार्गेटेड स्ट्राईक करण्यात आले.
सैन्य सूत्रांनी सांगितले की, ही कारवाई अत्यंत मोजकी, मर्यादित आणि अशांती न घडवणारी (non-escalatory) होती. या कारवाईत पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने टार्गेटच्या निवडीत आणि हल्ल्याच्या पद्धतीत अत्यंत संयम दाखवला आहे.
ही कठोर पावले पाहलगाम येथे घडविण्यात आलेल्या क्रूर अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अमानवी कृत्याचा सूड घेत, भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की, अशा हल्ल्यांमागील जबाबदारांना शिक्षा दिली जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात आज अधिकृत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने कळवले आहे