ठाकरवाडी-पिंपळखोरीतील वीजपुरवठा प्रश्न मार्गी; स्वीय सहायक गिरीश घुले यांचा तत्पर हस्तक्षेप; ट्रान्सफॉर्मर बसवून दिलासा

केंदूर (ता.शिरुर): ठाकरवाडी-पिंपळखोरी येथील नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचे स्वीय सहायक गिरीश वसंतराव घुले यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे समाधानकारक तोडगा निघाला आहे.

शिवाजी अंकुश थिटे यांच्या मागणीवरून सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच मंगेश श्रीपती भालेकर व माजी उपसरपंच भरत ज्ञानेश्वर साकोरे यांनी घुले यांच्याकडे यासंदर्भात विनंती केली होती. त्यानंतर गिरीश घुले यांनी त्वरेने पाठपुरावा करत सदर ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसविण्याची कार्यवाही करून घेतली.

या वेगवान निर्णयामुळे ठाकरवाडी-पिंपळखोरी परिसरातील ग्रामस्थांची वीज विषयक गैरसोय दूर झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. घुले यांची ही कार्यपद्धती, त्वरित प्रतिसाद व राजकीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली झालेली प्रभावी अंमलबजावणी ही निश्चितच कौतुकास्पद आहे. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल ठाकरवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत केंदूर ग्रामपंचायतीच्या वतीने घुले यांचे आभार मानले

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें