सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक; शिरूर पोलिसांची कारवाई, महिला आरोपी अटकेत

शिरूर (ता. शिरूर) : सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल ३३ लाख ४६ हजारांची फसवणूक करणार्‍या महिलेला शिरूर पोलिसांनी इंदापूर येथून अटक केली. निशा लक्ष्मण शिंदे (रा. इंदापूर, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव असून, तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विकास भिमराव नागरगोजे (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या परिचयातील काही लोकांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. “मी वरपर्यंत ओळखी वापरून नोकरी लावते,” असे सांगून तिच्यावर विश्वास बसवण्यात आला.

या माध्यमातून फिर्यादी नागरगोजे यांच्या पत्नीच्या एचडीएफसी बँक खात्यावरून इंदापूर येथील एचडीएफसी शाखेतील निशा शिंदे यांच्या खात्यावर तब्बल २३ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. याशिवाय १० लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. एकूण ३३ लाख ४६ हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे इंदापूर येथे तिचा ठावठिकाणा मिळवण्यात आला.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर यांनी तिला अटक केली. आरोपीस शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिला ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार विजय शिंदे यांचाही सहभाग होता. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे अनेकांची फसवणूक होण्यापासून रोखली गेली असून, पोलिसांच्या या जलद आणि ठोस कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें