रिंग रोड प्रकल्पात अडथळे; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर मकोका लावण्याची मागणी

रिंग रोड प्रकल्पात अडथळे; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर मकोका लावण्याची मागणी

पुणे, प्रतिनिधी –
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे हवेली तालुका अध्यक्ष कुमार गेणबा नितनवरे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित केला.

निवेदनात म्हटले आहे की, नितीन कुंजीर नावाचा सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार रिंग रोडच्या कामावर असलेल्या मजुरांना धमकी देत आहेत, मारहाण करत आहेत. एवढेच नव्हे, तर गावडेवाडी (बोल्हाई) येथील साहेबराव निकाळजे या गरीब कामगारासह जेसीबी चालक व अन्य मजुरांवरही काठीने हल्ला करण्यात आला. या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आले असून, हे कोणत्या राजकीय पाठबळासाठी केले गेले याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक चर्चेनुसार, नितीन कुंजीर हा एका लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय ओळखीचा वापर करून तो खुलेआम कायद्याला आव्हान देत असून, त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता अधिकच वाढली आहे.

रिपब्लिकन सेनेने या व्यक्तींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे नेतृत्व स्वतः मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार करत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी अशा अडथळे निर्माण करणाऱ्यांना “टायरमध्ये बसवण्याची वेळ येईल” असा इशारा दिला होता. तरीही त्यांच्याच कार्यक्षेत्रात अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात अडथळे निर्माण करणाऱ्या तत्वांवर वेळेवर आणि कठोर कारवाई झाली नाही, तर सार्वजनिक हिताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें