लोकसेवेचे ध्येय बाळगणाऱ्या प्रदीपदादा कंद यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

प्रथम बातमी वृत्तसेवा:

लोणीकंद, (ता. हवेली ): ८ मे आजचा दिवस खास आहे — एक असा दिवस, जो समाजकारणाच्या वाटचालीत नवे मापदंड उभे करणाऱ्या प्रदीपदादा विद्याधर कंद यांचा जन्मदिवस आपल्या अथक परिश्रमातून आणि जनतेसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या नेत्याने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रदीपदादा जीवन म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबात जन्मून त्यांनी शिक्षण, संघर्ष आणि सेवाभावाच्या आधारे समाजात मोठे योगदान दिले आहे. राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून जनतेच्या विकासासाठीचे साधन आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

त्यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा मध्ये अनेक विकासकामे झाली आहेत — रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी दिलेली भरीव कामगिरी उल्लेखनीय आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी त्यांनी नेहमी प्रेरणादायी विचार दिले आहेत आणि त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कार्यकर्ते, समर्थक, आणि सामान्य जनता त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांचे पुढील आयुष्यही आरोग्यदायी, यशस्वी आणि जनतेच्या सेवेने भरलेले असावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! — प्रदीपदादा कंद यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

———————————————————-

प्रदिपदादा कंद; एका थक्क करणाऱ्या सामाजिक-राजकीय प्रवासाचा प्रेरणादायी आलेख

महाराष्ट्राची पावन भूमी ही नेहमीच राष्ट्रासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या योद्ध्यांची जन्मभूमी राहिली आहे. स्वराज्य स्थापनेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पराक्रमी परंपरेचा वारसा लाभलेल्या या भूमीत स्वातंत्र्यानंतरही अनेक कर्तबगारांनी समाजसेवा व राष्ट्रसेवेच्या माध्यमातून आपले जीवन समर्पित केले. अशाच मातीतला एक तेजस्वी, ज्वलंत आणि परिवर्तनकारी नेता म्हणजे आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद.

घराण्याचा सामाजिक वारसा आणि प्रबळ संस्कार:

लोणीकंदसारख्या ग्रामीण भागात समाजाभिमुखतेची सखोल पाळेमुळे असलेले कंद कुटुंब स्थानिक विकासाचे एक महत्त्वाचे शिल्पकार ठरले. स्व. विद्याधर ‘पंत’ कंद, लोणीकंद ग्रामपंचायतीवर सलग पंचवीस वर्षे सरपंच म्हणून कार्यरत होते. पंतांची शिस्तप्रियता, शिक्षणासाठीचा आग्रह आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हा प्रदिपदादांसाठी प्रेरणास्थान ठरला.

शालेय जीवनातच नेतृत्वाचे बीज:

प्रदिपदादांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लोणीकंद येथे झाले. शालेय वयातच त्यांनी नेतृत्वगुण दाखवले. पुण्यातील मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी युवकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम आणि राजकीय भान यांच्याशी सखोल नाते जोडले. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये यश, पुणे विद्यापीठातील प्रतिनिधी पद, तसेच खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह विद्यार्थी स्नेहसंमेलनांचे यशस्वी आयोजन यामुळे दादांच्या नेतृत्वाची पहिली झलक राज्याला दिसू लागली.

गावच्या परिवर्तनासाठी कर्मभूमीची निवड:

महानगरातील झगमगाटाऐवजी गावकुसातील उणेपण भरून काढण्याची जिद्द मनाशी बाळगून दादा लोणीकंदला परतले. गावातील व्यसनाधीनता, बेरोजगारी, विघटनात्मक प्रवृत्ती यांचा अभ्यास करून ‘सोमेश्वर युवा मित्र मंडळाच्या माध्यमातून युवाशक्तीला एकत्र आणले. विकासासाठी सत्ता आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग घेतला व पुढे गावचे बिनविरोध सरपंच म्हणून स्वीकारले.

राजकारणात झंझावती वाटचाल:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर दादांची झपाट्याने प्रगती झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, नंतर पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी युवक संघटना बळकट करताना त्यांनी पक्षाला जिल्हा पातळीवर मजबूत केले.

या कामगिरीची दखल घेत मातोश्री सुरेखाताई विद्याधर कंद यांना देहु-लोणीकंद जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, आणि त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. यानंतर दादांनी अनेक सहकाऱ्यांना उमेदवारी मिळवून दिली व विजयश्री मिळवून दिली. यामुळे त्यांचे संघटन कौशल्य अधिक ठळक झाले.

जिल्हा परिषद अध्यक्षपद ते विधानसभेच्या उंबरठ्यापर्यंतचा प्रवास:

प्रदिपदादा कंद यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांची विकासकामे जिल्हाभर राबवून त्यांनी प्रशासकीय ताकद सिद्ध केली. २०१९ च्या शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा दावा प्रबळ होता. मात्र उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या नवीन पर्वातही त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला.

विकासाभिमुख संस्थात्मक कार्य:

दादांचे सूत्रच – “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण”. सरकारी यंत्रणेवर संपूर्ण अवलंबून न राहता त्यांनी स्वतःची संस्थात्मक विकासयंत्रणा उभी केली:

१.सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्था – महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन

२.सोमेश्वर दूध उत्पादक संस्था – शेतकऱ्यांना हमीभाव

३.सोमेश्वर स्वयंरोजगार सेवा संस्था – युवकांसाठी रोजगारनिर्मिती

४.सोमेश्वर क्रीडा कला मंच – ग्रामीण क्रीडा व सांस्कृतिक सशक्तीकरण

५.सोमेश्वर प्रतिष्ठान – मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी लोकसहभागातून कार्यरत

६. सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था – युवकांना आर्थिक स्वावलंबन

विशेष सामाजिक योगदान व कार्यक्रम :

गीतरामायण महाकथा महोत्सव — हजारोंच्या उपस्थितीत अभूतपूर्व यश, ४३ वी राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा — पंचतारांकित नियोजनातून भव्य आयोजन, लोणीकंद शाळेसाठी स्वखर्चाने ३५ लाखांचे विकासकार्य, १.५ कोटींचे हनुमान मंदिर — लोकवर्गणीद्वारे भव्य निर्मिती, ३.५ कोटींचा जलशुद्धीकरण प्रकल्प — दीर्घकालीन पाणीटंचाई दूर करण्यासाठी

एक विश्वासू नेता, एक सच्चा बांधिल कार्यकर्ता :

प्रदिपदादांचा प्रभाव इतका खोल आहे की, मतदारसंघाच्या किंवा राजकीय स्वार्थाच्या पलिकडे जाऊन ते मानवतेच्या भावनेतून समाजसेवा करतात. लोणीकंदसह संपूर्ण पूर्व हवेली परिसरातील प्रत्येक घराला आज त्यांच्या कार्याचा स्पर्श लाभलेला आहे.

शुभेच्छा आणि अपेक्षा :

दादांचा राजकीय-सामाजिक आलेख आज नवे शिखर गाठतो आहे. लोकनेते आदरणीय प्रदिपदादा कंद यांच्यासारखे जनतेच्या नाडीला अचूक ओळखणारे, विकासा भिमुखतेला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनकल्याणासाठी कार्यरत व्हावे, हीच जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान बनलेले नाव – प्रदिपदादा कंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

———————————————————-

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें