श्रीकृष्ण पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे(छाया: संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.१० (प्रतिनिधी) संदीप डोके
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग(ता.आंबेगाव) येथील श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधरण सभा सभासद व संचालक मंडळाच्या उपस्थित खेळीमेळी च्या वातावरणात उत्सहात पार पडली.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्रीराम मंदिरामध्ये सभा संपन्न झाली संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल किसन वायकर यांनी अहवाल वाचन केले प्रस्ताविक संचालक दिलिप शेटे यांनी केले संस्थेचे संस्थापक मारुती(नाना) डोके यांच्या उपस्थितीत सभा सुरु झाली वर्षभरात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करुन सभेस सुरुवात झाली
सभेस उपस्थित सभासद (छाया: संदिप डोके हडपसर)
या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रामकृष्ण पिंगळे यांनी सांगीतले कि संस्थेच्यावतिने विविध योजना सुरु केल्या असुन संस्थेच्या पाच शाखा असुन सर्व शाखा संगणीकृत आहे संचालक व कर्मचारी यांच्यामुळे संस्था प्रगती पथावर आहे असे त्यांनी सांगीतले समीर भास्कर डोके यांची तज्ञ संचालक म्हनुन निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी संस्थापक मारुतीनाना डोके ,अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, सरपंच वैभव पोखरकर,उपाध्यक्ष राजेंन्द्र भैय्ये ,संचालक दिलिप शेटे,संतोष पिंगळे,प्रशांत वाळुंज,नामदेव डोके,सुदाम आल्हाट,रामदास शिंदे,कुंदा दैने,शोभा पिंगळे,सुखदेव शेटे,कायदेशिर सल्लागार अँड.विलास शेटे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सल्लागार महेश डोके यांनी केले तर आभार संस्थेचे सहसचिव बबन सिताराम डोके यांनी मानले.