लोणीकंदच्या मातीतून राज्यकारभाराची दिशा देणारा नेतृत्वाचा उदय : प्रदीपदादा कंद यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रदिपदादा कंद : एका थक्क करणाऱ्या सामाजिक व राजकीय प्रवासाची उज्वल गाथा

लोणीकंद (ता. हवेली) – पारंपरिक कुटुंबातून आलेल्या आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेऊन राजकारणात आपले नांव उजळवणाऱ्या प्रदीपदादा कंद यांनी एक संघर्षमय, समर्पित आणि यशस्वी राजकीय प्रवास घडवला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून नेतृत्व विकसित करत त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कुटुंबाचा वारसा, शिक्षणाचा पाया

स्व. विद्याधर (पंत) कंद यांच्यासारख्या लोकाभिमुख सरपंचाच्या घरी जन्मलेल्या प्रदीपदादा यांनी शालेय शिक्षण लोणीकंद येथे घेतले. पुढे पुण्यातील मॉडर्न हायस्कूल आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेत शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा प्रत्यय येऊ लागला. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून येत त्यांनी आपली संघटनशक्ती सिद्ध केली.

समाजकारणातून राजकारणात प्रवेश

गावातील बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि दिशाहीनतेचा सामना करण्यासाठी ‘सोमेश्वर युवा मित्र मंडळ’ या संघटनेची स्थापना करत प्रदीपदादांनी समाजकारणाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. या उपक्रमातूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य, नंतर बिनविरोध सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा टप्प्यांवरून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले.

प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टीचा ठसा

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना तब्बल साडेतीन हजार कोटींच्या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून दादांनी संपूर्ण जिल्ह्याच्या प्रगतीला गती दिली. ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ या तत्त्वावर चालणाऱ्या दादांनी स्वतःच्या खर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ३५ लाखांचा निधी दिला, तर जलशुद्धीकरण, महिला पतसंस्था, दुग्धउत्पादन संस्था, क्रिडा-कला मंच अशा विविध क्षेत्रांत उपक्रमशील नेतृत्व दाखवले.

राजकीय वाटचालीतला टप्पा बदलत, दिशाच कायम

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत पीडीसीसी बँकेचे संचालक म्हणून निवडून येणे ही त्यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष आहे. दादांनी कोणत्याही पदाच्या माध्यमातून नेहमी लोकांच्या गरजा समजून घेऊन विकासाभिमुख निर्णय घेतले आहेत.

स्वखर्चातून समाजासाठी योगदान

लोणीकंदच्या हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार, जलशुद्धीकरण प्रकल्प, जिल्हा परिषद शाळेतील विकासकामे या सर्व ठिकाणी दादांनी पदरमोड करून निधी उभारला. केवळ शासनावर विसंबून न राहता स्वतःची सामाजिक संस्थांमार्फत काम उभं करण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे.

एक भविष्याचा नेता

प्रदिपदादांचे नाव आज लोणीकंदापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांच्या नेतृत्वगुणांच्या, कार्यतत्परतेच्या आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे ते पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एक आश्वासक पर्याय म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाकडे राज्यपातळीवरील नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख मोलाच्या हार्दिक शुभेच्छा…!

(शब्दांकन : शहाजी बाप्पू शिंदे)

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें