खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; लोणी काळभोर पोलिसांची प्रभावी कामगिरी

लोणी काळभोर, पुणे | दिनांक २ मे २०२५ —लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या एका गंभीर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दि. १९ जानेवारी २०२० रोजी रात्री ९.३० वाजता कोंडेवस्ती, उरुळी देवाची येथे घडलेल्या या घटनेत निलेश बबन बोरकर (वय ३१) याने कौटुंबिक वादातून त्याचा भाऊ मंगेश बबन बोरकर याच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला होता. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी कसोशीने केला. दोषारोपपत्र १७ एप्रिल २०२० रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. विशेष सत्र केस क्रमांक १०४/२०२१ अन्वये आज न्यायालयाने आरोपी निलेश बोरकर याला जन्मठेपेची शिक्षा व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार ललिता कानवडे यांचे योगदान मोलाचे ठरले.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पोलीस अंमलदार ललिता कानवडे व तपासी अधिकारी सपोनि स्वप्नील लोखंडे यांना प्रत्येकी १०,००० रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे.

गेल्या चार महिन्यांत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एकूण ६ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी मिळवण्यात यश आले आहे, हे या ठाण्याच्या कार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें