हडपसर (प्रतिनिधी संदिप डोके)
कोंढवा खुर्द भागातील हंसकुटी आश्रम यांच्या श्री हंस जी महाराज पथ नामफलक उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि पूज्य श्री विभु जी महाराज यांच्या शुभहस्ते ब्रम्हा अव्हेन्यु शिवनेरी नगर येथे मोठया दिमाखात पार पडला.
या वेळी माजी नगरसेविका आरती बाबर,युवा उद्याेजक अमोल शिरस,मनसे महिला उपाध्यक्षा सुप्रिया सतिश शिंदे ,सतिश शिंदे आदीसह सर्व हंसकुटी आश्रमातील साधक उपस्थित होते.
मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातुन पथ नामफलकाचे काम करण्यात आले अमोल शिरस यांनी उपस्थितांचे आभार मानले.