गोमातेची ११११ आंब्याचा नैवेद्य अर्पण करून पूजा – गोसेवेचा संदेश देत गौरव झुरुंगे यांची सामाजिक प्रेरणा

बोरीपारधी चौफुला, दौंड (प्रतिनिधी): अक्षय तृतीयेच्या मंगल निमित्ताने श्री बोरमलनाथ ट्रस्ट गोशाळा, बोरीपारधी चौफुला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ११११ आंब्याचा आंबरस नैवेद्य अर्पण करून गोमातेला भक्तिपूर्वक वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गौरव राजाराम झुरुंगे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.

देशभक्त आणि गो भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात गौरव झुरुंगे यांनी गोसेवेचे आणि भारतीय संस्कृतीतील गायच्या महत्त्वाचे दर्शन घडवले. त्यांनी गो शाळेतील व्यवस्थापन, अडचणी आणि गो सेवेच्या गरजा समजून घेतल्या तसेच उपस्थित तरुणांशी संवाद साधत गो संवर्धनाचा आणि संस्कृती रक्षणाचा संदेश दिला.

गौरव झुरुंगे म्हणाले, “भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ प्राणी नसून ती धर्म, संस्कृती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गोसेवा म्हणजेच धर्म सेवा, राष्ट्रसेवा आणि मानवतेची खरी साधना आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन गोरक्षा सामाजिक संस्था – महाराष्ट्र राज्य (दौंड तालुका) तसेच वैभव खैरे, व्यंकटेश शेळके पाटील मित्र परिवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

गाय व गोशाळा संवर्धनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी प्रेरणा या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल सर्व आयोजकांचे आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें