महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना

पुणे, दि. १ मे : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात व शनिवारवाड्यावर महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला असून, त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या वेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी डुडी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें