वाघोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – तांब्याच्या तारा चोरी करणारे तीन सराईत अटकेत, २४.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

१७२ सीसीटीव्हींचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा पर्दाफाश; पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पुणे – वाघोली पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात ६ लाख ४० हजार रुपयांचे तांब्याचे तारे आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेला १८ लाखांचा आयशर टेम्पो (MH-02-FX-1163) याचा समावेश आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त  अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त  हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

घटना २७ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजल्यापासून २८ फेब्रुवारीच्या पहाटे २.१५ वाजेपर्यंत घडली. वाघोली येथील जैन वेअरहाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा. लि. येथील गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे २५ लाख रुपयांचे तांब्याचे तारे व स्क्रॅप चोरून नेले होते. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ६९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी १७२ सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून व तांत्रिक तपासाच्या आधारे खालील आरोपींना अटक केली आहे:

१. राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२) – मुंबई

२. विनोद श्रीपाल जैन (वय ४०) – कामाठीपुरा, मुंबई

३. सोहेल फिरोज शेख (वय २२) – रे रोड, मुंबई

ही कारवाई पोउपनि वैजीनाथ केदार, पोहवा प्रदीप मोटे, प्रशांत कर्णवर, दिपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रितम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव आणि अमोल गायकवाड यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाली.

वाघोली पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील औद्योगिक गोडावूनमध्ये घडणाऱ्या चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.अधिक तपास वाघोली पोलीस करत आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें