कर्तव्यचुकार हवालदारावर एसपींचा करडी बडगा! तपासातील हलगर्जीपणामुळे गजानन खत्री निलंबित

 

शिक्रापूर (ता. शिरूर) – कर्तव्यात कसूर, तपासात ढिसाळपणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती उद्धट वर्तन यामुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन नारायण खत्री यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही ठोस कारवाई केली असून, खत्री यांना अधिकृत निलंबन आदेश देखील देण्यात आले आहेत.

खत्री यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान बंदोबस्ताचे कर्तव्य टाळले होते. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले तब्बल २५ गुन्हे प्रलंबित राहिले असून, एका आकस्मिक मृत्यू प्रकरणात हत्येचा संशय असतानाही त्यांनी वरिष्ठांना माहिती न देता दुर्लक्ष केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

त्यांच्या वर्तनाबाबतच्या तक्रारी इतक्याच गंभीर असून, चौकशीदरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग, बेजबाबदारपणा आणि गैरवर्तनाच्या आरोपांवरून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबनानंतर त्यांना पोलीस मुख्यालयातील राखीव निरीक्षकांकडे दररोज दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच एका कनिष्ठ अधिकाऱ्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस दलातील जबाबदारी, शिस्त आणि पारदर्शकतेचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें