पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते चाकण (भाम) येथे भाजपा पुणे जिल्हा उत्तर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन तसेच नवीन कार्यकारणीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

 

 

लोणीकंद प्रतिनिधी

खेड तालुक्यातील चाकण भाम येथे दि.९/९/२०२३रोजी पुणे नाशिक रोडवरील राजरत्न हॉटेलसमोर संतोषनगर येथे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर विभागीय कार्यालयाचे शुभारंभ प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची कार्यकारिणी जाहीर करून माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज”ला दिली.

 

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके , भाजपा नेत्या जयश्रीताई पलांडे , महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप भोंडवे,कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीचे उपसभापती रवींद्र नारायण कंद, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पुणे जिल्हा सरचिटणीसपदी भगवान शेळके, हवेली तालुका अध्यक्षपदी श्याम गावडे, शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी संदीप सातव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी पुनम चौधरी, जिल्हा उपाध्यक्षपदी सुदर्शन चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी प्रवीण काळभोर, पुणे जिल्हा सचिव पदी प्रदीप सातव, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विविध पदावर नियुक्ती करून निवडीचे पत्र देऊन पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांच्या जबाबदाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर दिल्याचे व शिरूर तालुक्यात इतर नियुक्त्याही लवकरच करणार असल्याचे शिरूर – हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज”शी बोलताना सांगितले.

 

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें