AI & STEM एअर जी कार्निव्हल 2025 – नवतंत्रज्ञानाचा उत्सव, विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी एक अनोखी संधी!

पुणे, लोहगाव: आधुनिक भारताच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि नवकल्पनांशी जोडण्यासाठी एअर जी इंटरनॅशनल आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RIT), लोहगाव यांच्या संयुक्त विद्यमाने AI & STEM एअर जी कार्निव्हल 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसांचा भव्य तंत्रज्ञान महोत्सव 25 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान RIT, लोहेगाव, पुणे येथे पार पडणार आहे.

उद्दिष्ट – विज्ञान, तंत्रज्ञान आणि करिअरचा मिलाफ

AI म्हणजे भविष्य, तर STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) म्हणजे त्याचा पाया. या कार्निव्हलचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे, शिक्षकांना NEP 2020 नुसार STEM शिक्षणासाठी प्रशिक्षित करणे आणि युवकांना AI व Robotics क्षेत्रातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन करणे.

प्रमुख आकर्षणं:

विद्यार्थ्यांच्या STEM व टेक प्रकल्पांचे थेट प्रदर्शन: शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प, समाजोपयोगी कल्पना आणि नवोन्मेष सादर करतील. AI व Robotics सादरीकरण: नवकल्पना, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यावर आधारित प्रात्यक्षिकं.

AI आणि करिअर मार्गदर्शन सत्र (10वीच्या विद्यार्थ्यांसाठी): यामध्ये AI क्षेत्रातील करिअरच्या संधी, आवश्यक कौशल्यं आणि पुढील अभ्यासक्रमांची माहिती दिली जाईल. युवकांसाठी स्टार्टअप व इनोव्हेशन मार्गदर्शन: स्टार्टअप संस्कृती, फंडिंग, प्रोटोटायपिंग व मार्केटिंग यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

शिक्षकांसाठी NEP 2020 व STEM ट्रेनिंग: नव्या शैक्षणिक धोरणांनुसार शिक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण.

Lab of Creativity by IINSparks: नवकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देणारे प्रयोग आणि कार्यशाळा. थेट अनुभव घेण्यासारखे: AI, IoT, Drones, Virtual Reality, Smart Systems या तंत्रज्ञानांचा थेट अनुभव.टेक स्टॉल्स, स्पर्धा आणि प्रेरणादायी व्याख्यानं: तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांची साक्षात भेट.

संस्थापक प्रताप पवार यांचे उद्गार:

> “आमचं ध्येय विद्यार्थ्यांना केवळ शिकवणं नव्हे, तर त्यांना टेक्नॉलॉजीचा अनुभव देऊन त्यांना जगाच्या स्पर्धेसाठी सज्ज करणं आहे. हे कार्निव्हल म्हणजे त्याच दृष्टीने एक पाऊल आहे.

प्रवासाची सुविधा:रामवाडी मेट्रो स्टेशन ते RIT कॉलेज (लोहेगाव) दरम्यान पेड बस सेवा उपलब्ध आहे. त्यामु,ळे कोणत्याही वयोगटातील सहभागींसाठी सहज पोहोचणं शक्य होणार आहे.

संपर्क व नोंदणीसाठी:

अधिक माहितीसाठी आणि प्रकल्प नोंदणीसाठी www.airginternational.org या संकेतस्थळाला भेट द्या. शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक – सर्वांसाठी प्रवेश खुला (नोंदणी आवश्यक).

AI & STEM एअर जी कार्निव्हल 2025 म्हणजे केवळ एक प्रदर्शन नव्हे, तर एक अशी चळवळ आहे जी भारतातील युवा पिढीला तंत्रज्ञानसाक्षर बनवण्याच्या दिशेने उचललेलं ठोस पाऊल आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें