जयेश शिंदे यांची शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड — भाजप संघटनेला नवा जोम

शिरूर तालुक्यासाठी ही नियुक्ती ठरणार निर्णायक!

शिरूर : भारतीय जनता पक्षाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी जयेश शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या निवडीने तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे.

 

शिंदे हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि भाजप किसान मोर्चाचे सचिव म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सामाजिक आणि पक्ष कार्यात त्यांचे सातत्याने योगदान राहिले असून, गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या निवडीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी शिंदे यांचा सत्कार करून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजप संघटना अधिक बळकट होईल आणि नव्या ऊर्जेसह कार्यरत राहील, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें