शिक्रापूरमध्ये पुनर्वसन भूखंडांवरील अनधिकृत प्लॉटिंगचा पर्दाफाश – प्रशासनाकडून तात्काळ कारवाईला सुरुवात, महाघोटाळ्याची शक्यता!

शासकीय जागेवर बेकायदेशीर प्लॉटिंग – स्मशानभूमी गायब!; प्रशासन ठाम – दोषींवर कठोर कारवाई होणार

शिक्रापूर (ता. शिरूर) – शिक्रापूर राऊतवाडी परिसरातील गट क्र. ४२, ५० व ५८९ मध्ये पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या शासकीय जमिनींवर भूमाफियांनी बेकायदेशीर प्लॉटिंग करून सार्वजनिक सुविधा उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असून, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

भूमाफियांकडून सार्वजनिक सुविधांचा विध्वंस

शासकीय नकाशानुसार आरक्षित असलेल्या जागांवर बेकायदेशीरपणे प्लॉटिंग सुरू करून भूमाफियांकडून रस्ते, गटारलाईन, स्मशानभूमी व शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचे अस्तित्वच पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. परिणामी, पुनर्वसित नागरिकांचे मूलभूत हक्क धोक्यात आले आहेत.

तळेगाव ढमढेरे मंडल अधिकारी, शिक्रापूरचे तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत अतिक्रमित भूखंडांचा पंचनामा करण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, लवकरच चौकशी अहवाल तहसील कार्यालयातून वरिष्ठ स्तरावर सादर होणार आहे.

एप्रिलला तहसीलदारांना चौकशीचे आदेश

उपविभागीय अधिकारी (शिरूर) यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिल्याने प्रशासनाची हालचाल अधिक गतीमान झाली आहे. या कारवाईमुळे भूखंड घोटाळ्यातील अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

महाघोटाळ्याची धास्ती – लोकांनी गाठले सरकार

स्थानिक शेतकऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर वरिष्ठ मंत्र्यांना लेखी तक्रारी पाठवल्या आहेत. त्यांच्या मते, सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून त्यांची विक्री केली जात आहे, जे सरळसरळ कायद्याला हरताळ फासणारे आहे.

प्रशासन ठाम – दोषींवर कठोर कारवाई होणार

पंचनाम्यानंतर योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी हे प्रकरण सर्वोच्च प्राधान्याने हाताळण्यात येत आहे. शिक्रापूरमध्ये भूमाफियांकडून सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगचा प्रशासनाने वेळेत घेतलेला पाठपुरावा आणि होणाऱ्या महाघोटाळ्याची शक्यता यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें