मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात लोणीकंदच्या शाळेला जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक, गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात

लोणीकंद शाळेची राज्यस्तरीय यशकथा: गुणवंत शिक्षकांचा गौरव

प्रतिनिधी, लोणीकंद

पुणे जिल्ह्यातील पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्ता व कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.

तसेच, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार हे मानाचं पारितोषिक समीर काकडे सर यांना तर नवोदय विद्यार्थी निवड मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार नुतन राऊत यांना संत तुकाराम हॉल, देहू येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आले.

पंचायत समिती हवेली अंतर्गत गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला माजी सभापती काळोखे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे, तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, लोणीकंद नगरीचे मा. सरपंच राहुलबापू शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गोपीनाथ कंद व अनेक मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

या यशस्वी कार्यक्रमामागे पुणे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हा सन्मान लोणीकंद शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक गौरवशाली क्षण ठरला असून, आगामी काळातही अशीच प्रगती आणि गुणवत्तेचा वारसा कायम राहावा, हीच अपेक्षा!

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें