“घोडगंगा बचाव, शेतकरी बचाव आंदोलन २०२५”शेतकऱ्यांचा विजय – घोडगंगा कारखान्याच्या खाजगीकरणाला पहिला दणका!

 

शिरूर, – शेतकरी बांधवांच्या हिताच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या “घोडगंगा बचाव, शेतकरी बचाव आंदोलन” ला मोठे यश मिळाले आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद करून त्याचे खाजगीकरण करण्याच्या कटाला पहिला धक्का बसला आहे.

कारखाना बंद पडण्यासाठी बनावट लेखापरीक्षण अहवाल सादर करणाऱ्या लेखापरीक्षक दिलीप वसंतराव फडणीस यांना लेखापरीक्षक नामावलीतून हकालपट्टीचा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आंदोलनास मोठा नैतिक विजय मिळाला आहे.

लेखापरीक्षक दोषी, आता संचालक मंडळावर लक्ष!

कारखाना बंदीच्या कालावधीत काम पाहिलेल्या संचालक मंडळालाही दोषी धरून, त्या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याचबरोबर संचालक मंडळाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तात्काळ चौकशीचे आदेश साखर आयुक्तांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे कार्यालयाला दिले आहेत.

प्रशासनात हालचाल – नवे नेतृत्व, नवी कारवाई!

दुर्दैवाने या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे गायकवाड मॅडम यांची बदली झाली आहे. मात्र, लवकरच नवीन प्रादेशिक सहसंचालकांची नियुक्ती होणार असून, त्यांच्या नियुक्तीनंतर संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शेतकरी चळवळीचा आवाज बुलंद!

या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व करणारे श्री. संजय शिवाजी पाचंगे, प्रदेश उपाध्यक्ष – भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगितले की, “ही केवळ सुरुवात आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमचा लढा अखेरच्या क्षणापर्यंत सुरू राहील. कारखाना शेतकऱ्यांचाच राहणार!”

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें