फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘डिजिटल रक्षक’ – मुंबईकरांसाठी नवी हेल्पलाइन

मुंबई: सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असताना, मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाची पाऊल उचलले आहे. मुंबई शहरातील नागरिकांसाठी “डिजिटल रक्षक” ही विशेष हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २४ तास नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी तत्काळ मदत व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

सध्या ऑनलाइन नोकरी, गुंतवणूक, फिशिंग, सेक्सटोर्शन आणि विशेषतः ‘डिजिटल अटक फसवणूक’ या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. बनावट कुरिअर, पोलीस, किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावले जाते आणि पैसे उकळले जातात.

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, नागरिकांनी 7715004444 किंवा 7400086666 या मोबाईल क्रमांकांवर कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधावा. संशयास्पद कॉल, बनावट नोटीसीज यांची तपासणी केली जाईल. गरज भासल्यास पोलिसांचे पथक पाठवून पीडितांना समुपदेशन व मदत देखील दिली जाईल.

“डिजिटल रक्षक” हे पाऊल केवळ गुन्ह्यांना अटकाव घालणारे नसून, नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणारे ठरणार आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता जागरूक राहावे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें