लोणीकंदमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी — १३४ वृक्षांचे रोपण, रक्तदान आणि भव्य मिरवणुकीने परिसर उजळला

 

लोणीकंद, पुणे : सामाजिक समतेचा जागर करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त लोणीकंद परिसरात अभूतपूर्व उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण असा साजरा करण्यात आला.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतेचे अभिवादन करण्यात आले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा वंदन करण्यात आले. या निमित्ताने सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने गायरान जमिनीवर १३४ औषधी, फुलझाडे व फळझाडांची वृक्षलागवड करण्यात आली.

पेरणे फाटा येथून लोणीकंद येथे आगमन झालेल्या भीमज्योतीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक लोणीकंद गावातून काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने भिमसैनिक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा निनाद, भीमगीतांचा जयघोष आणि अनुयायांचा जोश या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

संपूर्ण कार्यक्रमाने समता, बंधुता आणि सामाजिक जागृतीचा संदेश दिला असून, बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या उपक्रमांद्वारे प्रभावी पणे झाले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें