श्रीक्षेत्र तुळापूर (ता.हवेली) येथील नागरमल वस्तीतील डोंगरावर असलेले सुमारे १२ व्या शतकातील पुरातन मंदिराच्या दिवाबत्तीसाठी पुजारांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेली जमीन सद्यस्थितीत असणारे देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून ही जमीन विकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप खंडोबा मंदिर येथील पुजाऱ्यांनी केला असून धरणे आंदोलन करण्यासाठी पुजाऱ्यांनी लोणीकंद पोलीस ठाणे, मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे , मुंबई प्रधान सचिव, विधी व न्यांय विभाग मुंबई, गृह मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबईं, पत्रकार भवन पुणे, यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र तुळापूर धर्मयोध्दे श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापासूण जवळच प्राचीन काळातील श्री.नागरमल खंडोबा मंदिर आहे .ह्या देवस्थान ची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. या देवस्थानची मांजरी बुद्रुक येथे २४ एकर तर तुळापूर येथे २५ एकर जमीन आहे.मंदिराचे पुजारी हे धनगर समाजाचे अशिक्षीत लोक आहे. धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर मांजरी बुद्रुक येथील शेत जमीनीचा विक्री व्यवहार करत आहे. व काही रक्कम विसार म्हणून देखील त्यांनी स्वीकारली आहे. अशी माहिती येथील आंदोलक पुजाऱ्यांनी दिली आहे.
संपत्तीच्या लोभापोटी संबंधित ट्रस्ट स्वतःचा मनमानी कारभार करत देवस्थानची जमीन लाटून ती विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यानंतर देवस्थानच्या ठिकाणच्या स्थानिक पुजाऱ्यांनी या गोष्टीला विरोध करत देवस्थानच्या पायथ्याशी धरणे आंदोलन सुरू केले आहे, संबंधित ट्रस्ट तातडीने रद्द करून नवीन अध्यक्षांची निवड करण्यात यावी, तसेच देवस्थानच्या जमिनीची विक्री करून देऊ नये अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहेत.
न्यायालयीन कक्षेत देवस्थानच्या जमिनीसाठी माझा लढा गेले तीस वर्षे चालू आहे,त्यामुळे तर जमीन वाचली,मुळात मांजरी बुद्रुक येथील जमिनीचा ताबा कुळांकडे आहे,आणि तुळापूर येथील जमिनीचा ताबा तेथील पुजारी यांच्याकडे आहे,माझा जमीन विकण्याचा हेतू नाही,उलट जमीन वाचवण्यासाठी माझा लढा चालू आहे, त्यासाठी लाखो रुपये मी घालवले आहेत,आमच्या पूर्वजांनीच ही जमीन देवस्थानला दान म्हणून दिली होती:- मधुकर घुले,अध्यक्ष-श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट