वाघोली; गुरुदत्त सोसायटीतील महिलांच्या अनेक समस्या…

संदिप सातव यांच्या कडून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन..

वाघोली; भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदिप सातव यांनी वाघोली येथील गुरुदत्त सोसायटीमध्ये भेट देऊन स्थानिक महिलांसोबत संवाद साधला. या संवादा दरम्यान परिसरातील महत्त्वाच्या समस्या महिलांनी सातव यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

प्रमुख समस्यांमध्ये स्ट्रीट लाईट्सची गैरसोय, कमी दाबाने येणारा विद्युत प्रवाह, तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची झालेली दुरवस्था यांचा समावेश होता. महिलांनी या अडचणी संयमाने व स्पष्टपणे मांडल्या. यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या संवाद प्रसंगी बोलताना संदिप सातव यांनी, “महिलांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली आहे. लवकरच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ठोस उपाययोजना राबवण्यात येतील,” असे आश्वासन दिले, ते पुढे म्हणाले, “महिलांचा आवाज हा विकास प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. तो ऐकून घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या समस्या लवकर सुटतील, अशी अपेक्षा आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें