पिंपळे खालसा:(ता.शिरूर) कवयित्री सीमा जाधव धुमाळ लिखित ‘काव्यसीमा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा पिंपळे खालसा येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. डॉक्टर श्रीधर धुमाळ (जॉईंट कमिशनर), माध्यमिक व उच्य माध्यमिक चे सर्व शिक्षक वृंद, पिंपळे गावचे सर्व पदाधिकारी तसेच कवयित्रींचे आई-वडील,पती यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी कवयित्रींचे पती संतोष जाधव, वडील विठ्ठल धुमाळ, आई संजना धुमाळ, चुलते प्रकाश धुमाळ, बंधू राजेंद्र धुमाळ, विजय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवयित्री सीमा जाधव धुमाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या पुस्तकामागे माझ्या कुटुंबियांचे, विशेषतः पती, आई-वडील व कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे अमूल्य सहकार्य लाभले. ‘काव्यसीमा’ म्हणजे माझ्या भावना, अनुभव आणि जीवनातील संवेदनांची कवितांमधून केलेली मांडणी आहे.” यावेळी उपस्थित सर्वांनी कवयित्रीच्या पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.