युवा पोलीस अधिकारी सागर धुमाळ यांचे दुःखद निधन

 

पिंपळे खालसा (ता. शिरूर) गावाचा लाडका, पोलिस खात्यातला कर्तव्यदक्ष अधिकारी आणि मित्रांचा जीवाभावाचा सागर केवळ ३२ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. पोलीस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ यांचं ७ एप्रिल रोजी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गाव, पोलीस विभाग आणि मित्रमंडळींत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर धुमाळ हे अत्यंत गरीब व साध्या घरातून आलेले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी पोलीस उपनिरीक्षकपद गाठलं. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असून, वडील विलास धुमाळ यांनी कष्टाने आपल्या मुलाला मोठं केलं. सागर त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता.

२०२३ मध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांना किडनीचा आजार झाला. त्यांच्या आईने आपल्या मुलासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू होती. मात्र ७ एप्रिल रोजी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने वाशी एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सागर यांचा स्वभाव मनमिळावू, शांत आणि प्रामाणिक होता. त्यांच्या निधनानंतर नवी मुंबईपासून पिंपळे खालसा पर्यंत दुःखाची लाट पसरली. सोशल मीडियावर अनेकांनी सागरच्या आठवणी, फोटो व श्रद्धांजली संदेश शेअर केले.

त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पिंपळे खालसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांचा मानद गार्ड ऑफ ऑनर, वाजतगाजत अंत्ययात्रा आणि अश्रूंनी भरलेले डोळे… संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता.

त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. एक होतकरू अधिकारी आणि कुटुंबाचा आधार अकस्मात गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें