विशेष प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रे ग्रामस्थांच्या वतीने, राज्यमंत्री मेघना साकोरे/ बोर्डीकर यांची परभणी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल व पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांची ओबीसी समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच वडगांव सुक्रे येथील जेष्ठ नागरिक प्रल्हाद शिवाजी गवळी यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती मायभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष सतिश शिंगणे यांनी माध्यमांना दिली.
सन्मान सोहळा कार्यक्रमास नेते विलाजी बाबर, सूरेश भुमरे , डॉ. खटिंग सर, प्रकाश गोरे, देवा शिंदे, मा. तालुकाध्यक्ष आकाश लोहट, मा. सरपंच सुभाष गव्हाणे, डिगाबर शिंदे, पर्वत म्हस्के, यांच्यासह अनेक मान्यवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी निवेदन देत मेघना साकोरे यांच्याकडे विविध विकास कामांच्या मागण्या केल्या, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळामध्ये गावातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही मेघना साकोरे यांनी दिली, तसेच राजेश विटेकर यांच्या हस्ते धार्मिक सामाजिक कार्यक्रमासाठी बनविलेल्या स्वयंपाक घराचे उद्घाटन करण्यात आले तसेच या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
भाषणा दरम्यान, पालकमंत्री मेघना दीदी यांच्याकडे ‘श्रीक्षेत्र नृसिंह’ पोखरणी देवस्थानला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्याची मागणी तसेच जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बाबळगाव परिसरात औद्योगिकरण (एमआयडीसी) करावे , तसेच ‘संत साईबाबा’ यांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी गावचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी मायभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष सतिश शिंगणे यांनी केली आहे.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन मा. तालुका अध्यक्ष अरुण गवळी, मा. सरपंच सुभाष गव्हाणे व मायभूमी फाउंडेशन सदस्य, यांच्यासह महायुतीचे तसेच भाजपाचे कार्यकर्ते, व वडगाव सुक्रे येथील ग्रामस्थांनी केले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अध्यक्ष सतीश शिंगणे यांनी केले तर सरपंच उद्धव रावजी भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.