नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये लोणीकंद जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांची निवड…

लोणीकंद, (ता.हवेली):-दरवर्षी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यामध्ये पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंदच्या अन्वय गणेश आंबेडकर,गौरी हनुमंत चव्हाण,अमृता लक्ष्मण इथापे, पियुष नंदकुमार गपाट या विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री अनुसे यांनी दिली.या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, राहूल शिंदे, कावेरी कंद,डॉ. सोनाली जगताप, सागर कंद, जय कंद, प्रसाद होले, सोहम शिंदे, बापूसाहेब ढमढेरे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना माया हंबीरराव लंघे व हंबीरराव बाबासाहेब लंघे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पी.डी.सी.सी बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद यांनी तसेच शिक्षणतज्ज्ञ गोरक्षनाथ झुरुंगे, सरपंच मोनिका कंद, उपसरपंच अतुल मगर, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख शांता इचके, विस्तार अधिकारी शंकर मुंढे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें