मुखई, (ता. शिरूर): महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे कडून घेण्यात आलेल्या एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखईच्या तब्बल ३४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीसाठी २१ विद्यार्थी व सारथी शिष्यवृत्तीसाठी १३ विद्यार्थी पात्र झाले या सर्व विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना गजानन दळवी,जयकुमार गायकवाड, संतोष दौंडकर,संजय गावडे,संतोष खताळ,अनिल वारे,मंगल शेळकंदे , स्वाती दिवटे यांनी मार्गदर्शन तर लेखनिक विजय गायकवाड कर्मचारी दत्तात्रेय ढवळे व गणेश ताठे यांनी सहकार्य केले.एन.एम.एम.एस.ही परीक्षा मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या मार्फत २००७ -०८ पासून आर्थिक दुर्बल घटकासाठी घेतली जाते.
आर्थिक मागास विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून प्रती गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी ४८००० रुपये मिळतात.या सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ मुखईच्या अध्यक्षा जयश्री पलांडे ,कार्याध्यक्ष अशोकराव पलांडे उपाध्यक्ष सुभाष आबा पलांडे सचिव सुरेश बापू पलांडे,संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक बापूसाहेब लगड यांनी अभिनंदन केले.